English :

An old man once shared a story with a young boy:
“Before I leave, let me tell you a small story.
A certain shopkeeper once sent his son to learn about the secret of happiness from the wisest man in the world. The boy traveled for forty long days, crossing deserts, valleys, and hills, until finally, he reached a beautiful castle that stood high on top of a mountain. This was where the wise man lived.
But when the boy entered the palace, he didn’t find a quiet sage meditating or living in solitude as he had imagined. Instead, the castle was full of life — merchants moved about selling their goods, visitors were engaged in deep conversations in every corner, musicians were playing soft and pleasant tunes, and there were tables filled with delicious and exotic food. The boy waited for two hours before the wise man could attend to him.
Finally, the wise man listened patiently as the boy explained his purpose — to learn the secret of happiness.
The wise man smiled and said, ‘I don’t have time to explain it to you right now. But I want you to take a walk around my palace. Explore everything you can see. However, I will give you a task.’
The wise man handed him a teaspoon that held two small drops of oil and said, ‘As you explore, carry this spoon carefully. Make sure that the oil does not spill.’

The boy set out on his journey around the palace. He walked up and down the grand staircases, moved through the beautiful hallways, but throughout the tour, he kept his eyes fixed on the spoon. His only concern was not to spill the oil.
After two hours, the boy returned.
The wise man asked, ‘Well, did you see the Persian carpets in my dining hall? The wonderful garden it took my gardener ten years to create? The rare manuscripts in my library?’
Embarrassed, the boy admitted that he had seen none of these things. He was too focused on not spilling the oil.
The wise man smiled and said, ‘Then go back and see the wonders of my world. A person cannot understand life without seeing the beauty that surrounds him.’
Relieved, the boy took the spoon again and went on his second walk. This time, he admired everything — the beautiful art on the ceilings, the colorful gardens, the mountains in the distance, and the fine details of every room. He allowed himself to enjoy the beauty all around him while still trying to carry the spoon carefully.
Upon returning, he excitedly described everything he had seen.
The wise man then asked, ‘And what about the drops of oil?’
The boy looked down at the spoon and saw that the oil was gone.
The wise man gently said, ‘There is only one advice I can give you: The secret of happiness is to enjoy all the wonders of the world, but never forget the few drops of oil in the spoon.'”
The boy (shepherd), who was listening, understood the meaning, just like a shepherd must care for his sheep, no matter where he goes.
One should enjoy life, explore, learn, and appreciate the world but without neglecting duties and commitments. Both are equally important for a happy, meaningful, and successful life.
Source Credit: Google

Marathi : आनंदाचे रहस्य

एक वृद्ध माणूस एका मुलाला एक गोष्ट सांगत होता :

“मी निघण्याआधी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो.

एका व्यापाऱ्याने आपल्या मुलाला जगातील सर्वात शहाण्या माणसाकडून आनंदाचा रहस्य शिकण्यासाठी पाठवले. तो मुलगा तब्बल चाळीस दिवस वाळवंटे, डोंगर-दऱ्या पार करून शेवटी एका उंच डोंगरावर असलेल्या भव्य महालात पोहोचला, जिथे तो शहाणा मनुष्य राहत होता.

पण जेव्हा मुलगा महालात गेला तेव्हा त्याला ध्यानधारणेत गुंतलेला किंवा एकांतात राहणारा संत न दिसता तिथे खूपच गजबजाट दिसला व्यापारी आपल्या वस्तू विकत होते, कोपऱ्यांत लोक चर्चा करत होते, काही वादक संगीत वाजवत होते आणि मेजावर चविष्ट व विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांनी भरलेले ताट होते. दोन तास वाट पाहिल्यानंतर त्या शहाण्या माणसाने मुलाकडे लक्ष दिले.

त्याने शांतपणे मुलाचे म्हणणे ऐकले आणि सांगितले, “सध्या मी तुला आनंदाचे रहस्य सांगू शकत नाही. पण त्याआधी तू माझा महाल फिरून पाहा. पण एक काम कर.”

त्याने मुलाला दोन थेंब तेल असलेला चमचा दिला आणि सांगितले, “तू महालात फिरताना हा चमचा हातात धरून ठेव. पण तेल सांडू देऊ नकोस.”

मुलगा महालभर फिरू लागला. तो जिने चढला, उतरला, दालनांमधून गेला, पण त्याचे डोळे सतत चमच्यावर ठेवलेले होते. त्याचे सर्व लक्ष फक्त तेल सांडू न देण्यावर होते.

दोन तासांनी तो परत आला.

शहाण्या माणसाने विचारले, “तू माझ्या जेवणाच्या दालनातील फारशियन गालिचे पाहिलेस का? बाग पाहिलीस का, जी तयार करायला माझ्या माळ्याला दहा वर्षे लागली? माझ्या ग्रंथालयातील दुर्मिळ हस्तलिखिते पाहिलीस का?”

मुलगा लाजून म्हणाला की त्याने काहीच पाहिले नाही, कारण त्याचे संपूर्ण लक्ष तेल सांडू न देण्यावर होते.

शहाण्या माणसाने हसून सांगितले, “तर आता पुन्हा जा आणि माझ्या जगातील सौंदर्य पहा. जीवन समजून घेण्यासाठी सभोवतालच्या सौंदर्याची जाणीव असणे आवश्यक आहे.”

आता थोडा मोकळा झालेला मुलगा पुन्हा निघाला. यावेळी त्याने सर्व काही पाहिले — भिंतींवरील चित्रे, सुंदर बागा, दूरवर दिसणारे डोंगर, फुलांचे सौंदर्य आणि प्रत्येक गोष्टीतील बारकावे पाहिले. तरीही तो चमच्यातील तेल सांभाळण्याचा प्रयत्न करत होता.

परत आल्यावर त्याने आनंदाने सर्व काही सांगितले.

शहाण्या माणसाने विचारले, “आणि तेलाचे थेंब?”

मुलाने खाली पाहिले तर चमच्यातील तेल सांडलेले होते.

शहाण्या माणसाने हसत सांगितले, “एकच सल्ला देतो आनंदाचे रहस्य म्हणजे जगातील सर्व सौंदर्य पाहणे पण चमच्यातील त्या तेलाच्या थेंबांना विसरू न देणे.”

तो मुलगा (मेंढपाळ) शांत राहिला. त्याला गोष्टीचा अर्थ उमगला होता. जसे मेंढपाळ प्रवास करू शकतो, पण त्याने कधीच आपल्या मेंढ्यांना विसरू नये.

आयुष्याचा आनंद घ्यावा, नवीन गोष्टी शिकाव्यात, अनुभव घ्यावेत व जगाचे सौंदर्य पहावे. पण आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये न विसरता. हाच आनंदी, अर्थपूर्ण आणि यशस्वी आयुष्याचा खरा मार्ग आहे.

Source Credit: गुगल