
English :
This story is about a widow from Naibrute City, New York. The woman had an 8-year-old child. That child was very naughty and angry. He used to get angry over every little thing. As the woman was a widow, she had to work in order to sustain her life. Hence, she was not able to give enough time to her son.
In her absence, the child became a victim of wrong company and he started keeping a knife with him from a very young age. He used to keep the edges of the knife very sharp. Once, he got into a fight with a child, and in his anger, he stabbed the kid with the knife. By the grace of God, that child survived.
When his mother found out, she got really worried. But, instead of scolding or beating him up for this, she used a very different way to explain to him.
The woman called her son and said: “Son, you know, the doctor who lives at the corner of the street, he uses the knife so well, that it heals people’s pain and it also enhances his reputation.
He has a big car today, so many big bungalows, do you also want to become such a big man?”
Hearing this, her son said: “Yes, I want to become one too.” The mother was very happy from inside and said to the son : “Son, you also learn to use a knife such that it can heal people’s pain.” Even as she said this, her son had a sharp knife lying in his pocket. But despite knowing this, the woman did not ask her son to remove the knife from his pocket.
She just motivated her son to do good work.
Her words affected him so much that the boy had resolved to do something for himself. And he kept thinking the same thing again and again, that he could become a very big man by using the knife.
That child was not able to pass his classes for many years, and used to fail every time. But after that day, a huge change took place in that boy. He started studying diligently every day and would bring two books from the library every day and read them. He continued with his studies very sincerely and surprisingly, the boy became a great doctor one day. And he wasn’t an ordinary doctor, he turned out to be a reputed neuro surgeon. He was made the head in the Department of Praiatic New Surgeon at the Jane Hawking Institute, just at the age of 33. And he became a very well-known doctor of New York.
The man also got New York’s biggest civil award. In the transformation that took place inside that child, his mother had only explained to him how to use a knife.
He did an operation that lasted about 22 hours and that was the operation to separate conjoined twins who were joined at the head. And it turned out to be very successful.
All the awards that he got in his life were dedicated to his mother. There truly is no other education in life like a mother’s teachings.
A mother’s wisdom did not resist her son’s bad habit but gave him the right direction and made his life meaningful. If we have only one goal of our life, we can reach there by making full use of our internal resources.
Source Credit: Heartfulness
Marathi :
ही गोष्ट न्यूयॉर्कच्या नायब्रूट शहरातील एका विधवा स्त्रीची आहे. त्या स्त्रीला आठ वर्षांचा मुलगा होता. तो मुलगा फार खोडकर आणि रागीट स्वभावाचा होता. छोट्या छोट्या गोष्टींवर तो रागवायचा. ती स्त्री विधवा असल्याने उपजीविकेसाठी तिला काम करावे लागे. त्यामुळे ती आपल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हती.
आईच्या अनुपस्थितीत तो मुलगा चुकीच्या संगतीत गेला आणि लहान वयातच त्याने खिशात चाकू बाळगायला सुरुवात केली. तो चाकूची धार नेहमी फार तीक्ष्ण ठेवायचा. एकदा त्याचा एखाद्या मुलासोबत वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने त्या मुलाला चाकूने भोसकले. देवाच्या कृपेने तो मुलगा वाचला.
हे आईला कळले तेव्हा ती खूप चिंतित झाली. पण तिने मुलाला ओरडले नाही, मारलेही नाही, तर अगदी वेगळ्या प्रकारे समजावले.
आईने मुलाला बोलावले आणि म्हणाली : “बाळा, तुला माहीत आहे ना, आपल्या रस्त्याच्या टोकाला जे डॉक्टर राहतात, ते चाकू इतक्या सुंदर पद्धतीने वापरतात की लोकांचे दुखणे बरे होते आणि त्यांची कीर्तीही वाढते. आज त्यांच्याकडे मोठी गाडी आहे, इतके मोठे बंगले आहेत. तुला पण असाच मोठा माणूस व्हायचं आहे का?”
मुलगा म्हणाला : “हो, मला पण तसं व्हायचं आहे.”
हे ऐकून आई मनोमन खूप आनंदी झाली आणि म्हणाली : “बाळा, तू पण चाकू असा वापरायला शिक की लोकांचे दुखणे बरे होईल.” त्या वेळी मुलाच्या खिशात खरंच एक तीक्ष्ण चाकू होता, पण आईला माहिती असूनही तिने त्याला चाकू काढायला सांगितले नाही. फक्त त्याला चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.
आईच्या या शब्दांचा मुलावर एवढा खोल परिणाम झाला की त्याने मनाशी ठरवले की, चाकू वापरून तो स्वतःसाठी काहीतरी मोठे करणार. तो सतत विचार करीत होता की या चाकूच्या योग्य वापराने तो मोठा माणूस होऊ शकतो.
तो मुलगा अनेक वर्षे वर्गात नापास होत राहिला. पण त्या दिवसापासून त्याच्यात मोठा बदल घडला. तो रोज मन लावून अभ्यास करू लागला, लायब्ररीतून दोन-दोन पुस्तके आणून वाचू लागला. अभ्यासात मन लावून तो पुढे गेला आणि आश्चर्य म्हणजे तो एके दिवशी मोठा डॉक्टर झाला. तो साधा डॉक्टर नव्हता, तर एक प्रसिद्ध न्यूरो सर्जन झाला. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्याची नेमणूक जेन हॉकिंग इन्स्टिट्यूटमध्ये न्यूरोसर्जरी विभागप्रमुख म्हणून झाली आणि तो न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध डॉक्टर ठरला.
त्या व्यक्तीला न्यूयॉर्कचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मिळाला. या मुलाच्या आयुष्यात झालेला बदल हा फक्त आईने चाकू कसा वापरायचा हे समजावून सांगितल्यामुळे झाला.
त्याने एक २२ तास चाललेली शस्त्रक्रिया केली होती. ती शस्त्रक्रिया डोक्याला जोडलेल्या जुळ्या भावंडांना वेगळे करण्याची होती आणि ती अतिशय यशस्वी ठरली.
त्याच्या आयुष्यात मिळालेले सर्व पुरस्कार त्याने आपल्या आईला अर्पण केले. खरंच, आईच्या शिक्षणासारखे जीवनात दुसरे शिक्षण नाही.
आईच्या शहाणपणाने मुलाच्या वाईट सवयीला विरोध न करता त्याला योग्य दिशा दिली आणि त्याचे आयुष्य अर्थपूर्ण केले. आपल्याकडे जर एकच ध्येय असेल, तर आपली अंतर्गत साधने योग्य वापरून आपण नक्कीच ते गाठू शकतो.
Source Credit: हार्टफुलनेस