
English :
In life, for all of us, sometimes there is happiness and sometimes sorrow, at times there are troubles and at times peace… all this goes on, but in every situation, it depends on us that what choice we make.
One fine morning, an old man and his grandson were sitting by the lake. Both the grandfather and grandson were talking very lovingly. The grandfather was trying to teach his grandson life lessons through normal conversation. Lovingly, the grandson asked the Grandfather, “Grandpa, please tell me a story.” The old man smiled and said, “Today, there is a small story running in my head.”
The grandson asked very curiously, “What is that?” Then Grandpa replied, “There’s a fight taking place within me… Between two wolves… A terrible fight…” The grandson asked, “Grandpa, what kind of fight is this?”
Grandfather further explains, “One wolf is full of evil, anger, sorrow, greed, and ego. And the other is full of goodness, joy, peace, love, kindness, and faith. And there is a fight going on between these two.”
Grandpa continued, “Son, this great battle is going on within you, and within everyone in this world.” He then went silent for a moment.
Suddenly, the grandson asked very innocently and curiously, “Grandpa, which wolf won this battle?”
Grandpa smiled and said, “The one we nurture and feed will win dear.”
Among the two wolves of evil and good, the wolf we nurture wins. We all go through many such situations in life when we have to choose between right and wrong. Ultimately, it is up to us, to decide what situation we will nurture and choose for our lives.
When we listen to the heart, we need not go through an elaborate mental process of making choices; we always know what is right.
Source Credit: Heartfulness
Marathi :
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी आनंद असतो, तर कधी दु:ख; कधी अडचणी येतात, तर कधी शांती असते… हे सगळं चालूच असतं. पण प्रत्येक परिस्थितीत आपल्यावरच अवलंबून असतं की आपण कोणता मार्ग निवडतो.
एका शांत सकाळी एक वृद्ध आजोबा आणि त्यांचा नातू तलावाजवळ बसले होते. दोघंही खूप प्रेमाने बोलत होते. आजोबा आपल्या नातवाला साध्या संभाषणातून आयुष्याचे धडे देत होते. नातवाने प्रेमाने विचारले, “आजोबा, मला एक गोष्ट सांगा ना.” आजोबा हसले आणि म्हणाले, “आज माझ्या मनात एक छोटीशी गोष्ट चालू आहे.”
नातवाने उत्सुकतेने विचारले, “काय गोष्ट आहे ती?” तेव्हा आजोबा म्हणाले, “माझ्या आत एक लढाई चालू आहे… दोन लांडग्यांमध्ये एक भयंकर लढाई…” नातू विचारतो, “आजोबा, कशाची लढाई?”
आजोबा पुढे म्हणाले, “एक लांडगा वाईट गोष्टींनी भरलेला आहे. (राग, दु:ख, लोभ, अहंकार यांनी भरलेला). आणि दुसरा लांडगा चांगल्या गोष्टींनी भरलेला आहे. (आनंद, शांती, प्रेम, दयाळूपणा आणि श्रद्धा यांनी). आणि ह्या दोघांमध्ये लढाई चालू आहे.”
आजोबा थोडे थांबले आणि पुढे म्हणाले, “बाळा, ही मोठी लढाई तुझ्यातही चालू आहे, आणि या जगातल्या प्रत्येकाच्या आत चालू आहे.”
अचानक नातवाने अगदी निरागसपणे आणि उत्सुकतेने विचारले, “आजोबा, मग शेवटी कोणता लांडगा जिंकतो?”
आजोबा हसले आणि म्हणाले, “आपण ज्याला वाढवतो, पोसतो, तो लांडगा जिंकतो रे.”
वाईट आणि चांगल्या लांडग्यांपैकी आपण ज्याला पोसतो, तोच जिंकतो. आयुष्यात आपण अनेक वेळा अशा परिस्थितींना सामोरे जातो जिथे चांगल्या आणि वाईट गोष्टींमध्ये निवड करावी लागते. शेवटी ते आपल्यावरच असतं की आपण कोणता मार्ग निवडतो आणि कोणती भावना वाढवतो.
जेव्हाआपणमनाच्या(हृदयाच्या) आवाजानेनिर्णयघेतो, तेव्हानिर्णयघेण्यासाठीफारविचारकरावालागतनाही, आपल्यालानेहमीचकळतंकीकाययोग्यआहे.
Source Credit: हार्टफुलनेस